Friday, January 20, 2017

[शिक्षणातला अंतिम निकष कोणता ?
एकदा आमचे असेच एक इंग्रजी शिक्षकांचे प्रशिक्षण होते. त्यात एक निवृत्त शिक्षक आले होते.आम्ही दिवसभर व्याकरण कोणत्या पद्धतीने शिकवायचे ?स्पेलिंग पाठ करावेत की नाही ? कविता कशी शिकवायची ?अध्यापन करताना शैक्षणिक साहित्य कोणते वापरायचे ?याचा काथ्याकूट आम्ही दिवसभर करीत होतो.संध्याकाळी ५ वाजले.सर्वांना जाण्याची घाई होती.आम्ही उठू लागताच ते निवृत्त शिक्षक बोलायला उठले आणि म्हणाले मी फक्त ३ मिनीट बोलणार आहे .वैतागाने सारे खाली बसले. ते शिक्षक म्हणाले की दिवसभर तुमची सर्व चर्चा मी ऐकली.तुम्ही शिकवण्याच्या काही पद्धती नक्की केल्या आहेत पण मी एक छोटे उदाहरण सांगतो ते जर तुम्ही नीट समजून घेतले तर तुम्ही चांगले शिक्षक व्हाल.आम्ही आता आणखी काय उपदेश ऐकायचा अशा भावनेने ऐकत राहिलो. ते म्हणाले की एका डोंगराच्या पोटाला एक झोपडी आहे.तिथे एक आदिवासी नवरा बायको राहतात. त्यांना एक ६ महिन्याचं मूल आहे.आजूबाजूला एक ही घर नाही. एकदा संध्याकाळी नवरा अचानक गावाला गेला. पत्नी आणि मूल एकटेच आहेत.अचानक मध्यरात्री ते मूल किंचाळून रडायला लागले तर ती आई काय करेल ? सांगा ना काय करेल ? आम्ही सारे शांत झालो. कुणीच काही बोलेना. ते शिक्षक म्हणाले की ती बालमानसशास्त्राची पुस्तके उघडून पाहिलं का ? की मुलांना कसे हाताळावे याच्या वेबसाईट उघडून पाहिलं का ?  आम्हाला मुद्दा कळाला. ते म्हणाले ती यातले काहीच करणार नाही. ती तिला सुचेल ते करीन. ती त्याच्यापुढे ताटली आणि चमचा वाजवेल त्याच्यापुढे नाचून दाखवीन. गाणी म्हणेल.त्याला दूध पाजीन.त्याला झोपडीबाहेर आणून चंद्र दाखविन. हे ती तिथपर्यंत करीन की जोपर्यंत ते मूल शांत होत नाही. हे ती सारे का करीन ? हे तिला सारे का सुचेल ? कारण ते तिचे मूल आहे म्हणून. त्या शिक्षकाने क्षणभर सगळीकडे बघितले .थांबला आणि म्हणाले की त्या बाईसारखे तुमच्यासमोर बसलेले मूल तुम्हाला तुमचे वाटते आहे का ? तितके प्रेम तुम्हाला जर त्याच्याबद्दल वाटणार असेल तर माझ्या मित्रांनो तुम्ही जे काही वर्गात कराल,तेच उपक्रम असतील,तीच अध्यापनाची पद्धती असेल. तुम्ही हातात जे काही घ्याल तेच शैक्षणिक साहित्य असेल आणि तुम्ही जो विचार कराल तेच शैक्षणिक तत्वज्ञान असेल. आणि ते शिक्षक शांत बसले.आम्ही थक्क झालो.  
(शिक्षकांसाठी साने गुरुजी या आगामी पुस्तकात
▪शिकवता  का कोणी  विचारत नाही  .विचारले  जाते  फक्त  टाचण.
अन  गम्मत  म्हणजे  बघितले  पण जात नाही. 
▪अभ्यासक्रम  कोणी  विचारत नाही . गरज  फक्त  नियोजनाची. 
▪विद्यार्थी  कोणिच बघत नाही  बघतात फक्त  खिचडी. 
▪पुस्तके मिळाली  का  सर्वांना.  घेणे  न  देणे.
वाटप  रजिस्टर  महत्वाचे. 
▪शाळेत  येऊन  बसलेले  मुलं  शिकवण्याची  वाट बघतात  पण शासनाला  काळजी  शाळाबाह्य  ची.
▪चिमुकल्या  ची एखादी  कला बघायला  वेळच  नाही. 
फोटो  महत्वाचा. 
▪विद्यार्थी  अडचणी  गेल्या  चुलित . पालकभेट  रजिस्टर  महत्वाचे. 
▪ संस्काराचे बोलायचे  नाही.  अहवाल  महत्त्वाचे. 
▪गुणवत्ता  सांगु  नका. 
संडास  वापरात  आहे  का ते  सांगा. ?
▪शिक्षक  कमी आहेत सांगु  नका.  कागद  लवकर  आला  पाहिजे? ?
▪शाळेत  आल्यावर  शिक्षक   शिकवतो  का  हे  महत्त्वाचे  नाही. 
तो  फक्त  वेळेवर  आला  पाहिजे.🌷 झाड किती अक्षांश व रेखांशावर लावायचे हे माप घेऊन लावा, ते जगल कसं याचं काय, वन विभागाला कोटीने पैसा, काम मात्र शिक्षण विभागण करायचं
👍🏻 स्वच्छतागृह स्वच्छ ठेवा व वापर करा , प्यायच्या पाण्याच्या सोयीचा पत्ता नाही.
🕹 सर्व विभाग महसुल, आरोग्य, पोलीस, वन  बोलणार शिक्षक खुप प्रामाणिक आणि हुश्शार खुप छान काम करतात अन पाठीमागे लई मज्जा मास्तरांची दिवाळी, उन्हाळी सुट्टया.
🕹 शिक्षकांसारखा अष्ठ पैलुहुन जास्त पैलु असणारा जगात नाही.
🌷🌷 सलाम त्या सर्व शिक्षकांना👏👏👏👏👏👏
💐💐💐🌺🌺🌺🌹🌹🌹🌷🌷🌷

No comments:

Post a Comment